महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वात आघाडीचे राज्य आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या १५ टक्के निर्मिती महाराष्ट्रात होते.परंतु तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार आता नवीकरणीय ऊर्जा निर्मितीवर भर देत आहेत. अशातच नुकतीच राज्य सरकराने मोठी वीजदरकपात जाहीर केली आहे. ज्यामुळे आता पुढील ५ वर्षे वीजबिल वाढणार नाही तर कमी होतं जाणार आहे.